IMG-LOGO
क्रीडा

आंतरराष्टीय टेबल टेनिस स्पर्धेत तनिषा कोटेचा हिला कांस्य पदक

Thursday, Oct 31
IMG

मस्कत, येथे झालेल्या जागतिक जुनिअर सर्किट, ओमान जुनिअर अँड कॅडेट स्पर्धेत तनिषाची भारतीय कॅडेट मुलींच्या "अ" संघातून खेळतांना कांस्य पदक मिळविले

आंतरराष्टीय टेबल टेनिस स्पर्धेत तनिषा कोटेचा हिला कांस्य पदक मस्कत, येथे झालेल्या  जागतिक जुनिअर सर्किट, ओमान जुनिअर अँड कॅडेट स्पर्धेत  तनिषाची भारतीय कॅडेट मुलींच्या  "अ" संघातून खेळतांना कांस्य पदक मिळविले  तिच्या समवेत कुमारी सुहाना सैनी (हरियाणा) हिचाही या संघात समावेश होता.  हि स्पर्धा दि. २४ ते २८ ऑक्टोबर २०१९ दरम्यान मस्कत येथे पार पडल्या.  तनिषा कोटेचा नासिक जिमखाना येथे जय मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली टेबल टेनिस व शारीरिक  व्यायामाचे नियमितपणे सराव करते.  या स्पर्धेत १७ देशांच्या  १२६ खेळाडूंनी भाग घेतला होता. उपांत्य फेरीत गाठण्या  अगोदर भारतीय "अ" संघाने स्वीडन च्या संघाचा ३-० तसेच श्रीलंकेचा ३-०, लेबेनॉन चा ३-०  पराभव केला. मात्र उपांत्य फेरीत भारतीय "ब" संघाकडून पराभव स्वीकारत कास्य पदकावर समाधान मानावे लागले. नाशिककरिता अभिमानाची बाब  म्हणजे आंतरराष्टीय स्तरावर पदक मिळवणारी नाशिकची तनिषा हि पहिली टेबल टेनिसपटू आहे. तिच्या या सुयशाबद्दल  नासिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार विजेते नरेंद्र छाजेड, राज्य संघटनेचे अध्यक्ष राजीव  बोडस,  सरचिटणीस  प्रकाश तुळपुळे, सचिव यतीन टिपणीस, अर्जुन पुरस्कार विजेते कमलेश मेहेता, नासिक जिमखान्याचे सचिव राधेश्याम मुंदडा, संघटनेचे सचिव शेखर भंडारी, राजेश भरवीरकर, अभिषेक छाजेड, राकेश पाटील, मिलिंद कचोळे, हर्षल पवार, अजिंक्य शिंत्रे आदींनी तिचे अभिनंदन केले. 

Share: