IMG-LOGO
मनोरंजन

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त लिलावती रुग्णालयात दाखल; टेस्ट निगेटिव्ह

Saturday, Aug 08
IMG

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजय दत्तला श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले

मुंबई : दि ०८ ऑगस्ट :  बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला शनिवारी सायंकाळी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर नॉन कोविड कक्षामध्ये उपचार सुरू आहेत.संजय दत्तला करोना सदृश्य लक्षणं जाणवल्यानं तातडीनं रॅपिड अॅण्टीजेन चाचणी करण्यात आली. या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यानंतर आरटी-पीसीआर चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आला असून, या चाचणी रिपोर्ट अजून आलेला नाही.

Share: