येवला तालुक्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने नगरसुल येथे वीज पडून बैलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
येवला : तालुक्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने नगरसुल येथे वीज पडून बैलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला असून आज दि.३० रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास येवला परिसरातील पूर्व भागातील नगरसुल शिवारात सोनवणे वस्ती वरील पहाडी वस्तीत बाळू सोनवणे यांच्या बैलावर दुपारी साडेतीनच्या सुमारास वीज पडून जागीच ठार झाला. शेतीमालासह शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून या येणाऱ्या पावसाला बळीराजा वैतागला असून मका कपाशी बाजरी आणि कांद्याची रोपे अक्षरशहा या पावसामुळे खराब होऊ लागली आहे.