येवला तालुक्यातील अंदरसुल येथे पोहायला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.
अंदरसुल दि.४ l येवला तालुक्यातील अंदरसुल येथे पोहायला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. येथील कोळगंगा नदीवर दुपारच्या सुमारास काही मुलं पोहण्यासाठी गेले असता पाण्यात बुडून किरण भास्कर गरुड (वय १७) या युवकाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम सुरू केली परंतु किरणचा शोध काही लागेना कोपरगाव येथील तहसीलदार योगेश चंद्रे यांनी तात्काळ कोपरगाव येथील शोध मोहीम पथकास पाचारण केले दरम्यान रेस्क्यू टीमने अर्धा तासाने किरणचा शोध घेतला यावेळी अजून एक तरुण यात बुडाला असल्याची शंका होती मात्र तो सुखरूप असल्याचे निदर्शनास येताच शोध मोहीम थांबविण्यात आली अशी माहिती येवला तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी दिली. घटनास्थळी पोलिस नाईक हेबाडे,संदीप पगार,तलाठी कमलेश पाटील, आदी उपस्थित होते.आपत्कालीन समन्वयक सुशांत घोडके यांचे नेतृत्वाखाली दिपक थोरात ,संजय जगधने ,विजय मरसाळे ,प्रकाश मरसाळे ,भगवान कांदळकर यांनी ही रेस्क्यू मोहीम केली. मृत किरण हा कॉलेज बरोबर मोल मजुरी करून आपल्या आई-वडिलांना मदतीचा हात भार लावत होता मात्र अचानक त्याच्यावर काळाने घाला घातला या वृत्ताने परीसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.