IMG-LOGO
नाशिक शहर

जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने गृहदेवता पूजन सोहळा

Friday, Oct 18
IMG

जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि प्रमुख उपस्थितीत शनिवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता नाशिक शहरातील जय गुरुदत्त लॉन्स, औरंगाबाद रोड येथे सत्संग आणि गृहदेवता पूजन, पालखी मिरवणूक आदी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपीठाचे पिठाधिश्वर अध्यात्म शिरोमणी श्री श्री १००८ महामंडलेश्वर श्रीसंत सदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने वर्षभर  विविध लक्षवेधी धर्मसंस्कार सोहळे संपन्न होत असतात. भाविकांचा भक्तिमार्ग अधिकाधिक  विकसित व्हावा. यासाठी विविध उपक्रम देखील राबविण्यात येत असतात.  देवघरातील देवतांना रोज नित्य नियमाने स्नान,रोज नैवेद्य, देवघरातील पावित्र्य ,देवतांची जागृतता कशी वाढावावी , घराघरात सुख-शांती नांदावी यासाठी नाशिक शहरातील औरंगाबाद रोड येथील गुरुदत्त लॉन्स, येथे  ब्रम्हवृंदांच्या मंत्र घोषात गृहदेवता पूजन सोहळ्याचे  शनिवार दिनांक १९ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.सोहळ्याचा प्रारंभ दुपारी ३  वाजता श्रीबाबाजींच्या पालखी मिरवणुकीने होईल. यानंतर गृहदेवतांचे ब्रम्हवृदांच्या मंत्र घोषात पूजन संपन्न होईल.दुपारी ४ वाजता सत्संग सोहळ्यास प्रारंभ होणार आहे.भविकांनी येतांना पूजा साहित्य  पंचामृत, आरतीचे ताट, तांब्या,पाट,नारळ, आपल्या  देव्हाऱ्यातील देवता, बसण्यासाठी आसन आणावे आणि परिवारासह जोडीने गृहदेवता पूजेसआणि सत्संगात सहभागी व्हावे असे आवाहन नाशिक तालुका जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Share: