IMG-LOGO
मुंबई

लोकनेते राजारामबापू यांचे कार्यकर्तृत्व महाराष्ट्रासाठी दिशादर्शक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Wednesday, Aug 12
IMG

Loknete Rajarambapu's work is a guideline for Maharashtra - Chief Minister Uddhav Thackeray

मुंबई, दि.१२ ऑगस्ट  :  लोकनेते राजारामबापू पाटील यांची पिढी अतिशय अनुभव संपन्न असून बापूंचे कार्यकर्तृत्व महाराष्ट्रासाठी दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानभवन येथे केले.लोकनेते राजारामबापू पाटील जन्मशताब्दी समारोह कार्यक्रम आज विधानभवन येथे आयोजित केला होता. यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती नरहरी झिरवाळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री श्री. ठाकरे पुढे म्हणाले, राजारामबापू हे अतिशय स्वच्छ व चारित्र्यवान नेतृत्व होते. त्यांचा काळ पाहिला असता असे लक्षात येते की, ती  पिढी कर्तृत्ववान व  नशिबवान आहे दिग्गज मंडळी आजूबाजूला असल्यामुळे ते नशिबवान तर कार्य कर्तृत्वाने घडत गेल्यामुळे कर्तृत्ववान. बापू नुसते घडले नाही तर त्यांनी पिढी घडवली. लोकनेते, पदयात्री, असलेल्या राजारामबापू यांनी केलेल्या कार्यामध्ये मजूर वर्ग, शेतकरी, उद्योग सर्वसामान्य अशा सर्वांच्या विकासाचा समावेश आहे. त्यांचाच वारसा लाभलेले जयंतराव पाटील सहकारी असल्याचा अभिमान वाटतो असेही मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी सांगितले.

Share: