प्रभू श्री रामाच्या मंदिराचा शुभारंभ तमाम भारतीयांसाठी आनंदाचा क्षण - जयंत पाटील
प्रभू श्री रामाच्या मंदिराचा शुभारंभ तमाम भारतीयांसाठी आनंदाचा क्षण - जयंत पाटीलमुंबई दि.५ अॉगस्ट - प्रभू श्री रामाच्या मंदिराचा शुभारंभ क्षण हा तमाम भारतीयांसाठी आनंदाचा क्षण आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम हे कायमच भारतीयांचे दैवत राहतील असे ट्वीट करुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.आज अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदीराचा भूमीपूजन सोहळा पार पडत आहे. यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील यांनी त्यांच्या इस्लामपूर मतदारसंघात बांधलेल्या राम मंदिराचा फोटो ट्विट करत आम्ही नेहमीच प्रभू श्री रामाची भक्तीभावे पूजा करतो असे स्पष्ट केले आहे.