IMG-LOGO
नाशिक शहर

जिल्ह्यात आजपर्यंत १४ हजार १६ रुग्ण कोरोनामुक्त

Saturday, Aug 08
IMG

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १४ हजार १६ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला

नाशिक : दि ०८ ऑगस्ट : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १४  हजार १६  कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ४ हजार ३४६ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ५८५  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.*उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:*नाशिक ग्रामीण मध्ये  नाशिक १७६, चांदवड ३३, सिन्नर १८१, दिंडोरी ६६, निफाड १९२, देवळा ८९,  नांदगांव ७६, येवला ०५, त्र्यंबकेश्वर ११, सुरगाणा १२, पेठ ००, कळवण ०२,  बागलाण ३६, इगतपुरी ४६, मालेगांव ग्रामीण ६८ असे एकूण  ९९३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार ११५, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात २२६  तर जिल्ह्याबाहेरील १२  असे एकूण ४ हजार ३४६  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  १८  हजार ९४७  रुग्ण आढळून आले आहेत.*रुग्ण बरे होण्याची टक्केवारी*जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ७४.३०,  टक्के, नाशिक शहरात ७३.१९ टक्के, मालेगाव मध्ये  ७८.८४  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८१.८२  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७३.९७ इतके आहे.*मृत्यु :*नाशिक ग्रामीण १४१, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  ३३५, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ८९  व जिल्हा बाहेरील २० अशा एकूण ५८५  रुग्णांचा मृत्यु झाला आहे. *लक्षणीय :*◼️१८  हजार ९४७  कोरोनाबाधित रुग्णांपैकी १४  हजार १६  रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ४  हजार ३४६  पॉझिटिव्ह रुग्ण.◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७३.९७  टक्के..

Share: