IMG-LOGO
मनोरंजन

बॉलीवूड अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर

Wednesday, Aug 12
IMG

Bollywood actor Sanjay Dutt has been diagnosed with lung cancer

मुंबई दि. १२ ऑगस्ट  : श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं अभिनेता संजय दत्ताला 8 ऑगस्टला लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. संजय दत्तचा श्वसनाचा त्रास लक्षात घेता त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानं दत्त कुटूंबाला हायसं वाटलं. त्याच्या गळ्यात पाणी साचलं होतं आणि त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. यानंतर त्याला तातडीने लीलावती इस्पितळात भरती करण्यात आलं. गळ्यातलं पाणी काढून टाकण्यात आलं आणि नंतर त्यावर उपचारही करण्यात आले. त्याच्या अहवालात  संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चित्रपट व्यवसायाचे अभ्यासक कोमल नहाटा यांनी ट्विटरवरून संजय दत्तला कोरोना झाल्याची माहिती स्पष्ट केली आहे. नहाटा म्हणाले की, अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचं निदान झालं आहे. त्यांना पुढील उपचारासाठी अमेरिकेला घेऊन जाण्याचा विचार आहे.

Share: