IMG-LOGO
मुंबई

पाच दिवसात सोने-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या आजचा भाव

Friday, Aug 07
IMG

गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीचे दर विक्रम रचत आहेत.

मुंबई : दि ०७ ऑगस्ट : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीचे दर विक्रम रचत आहेत. आजही यात मोठी वाढ नोंदवण्यात आली. सराफा बाजारात आज 10 ग्राम सोन्याची किंमत 56 हजार पार गेली, तर चांदीचा दर मजुरीसह प्रति किलोमागे विक्रमी 78 हजार रुपये झाला.शुक्रवारी सोन्याच्या दरात 300 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे 1 तोळ्याचा दर 56 हजार 143 रुपये झाला. सोन्यासह चांदीच्या दरातही तेजी दिसत आहे. आज चांदीच्या दरात प्रति किलोमागे 1 हजार 750 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली असून नवीन दर 78 हजार गेला. मात्र नंतर यात थोडी घट झाली आणि हा दर 77 हजार 802 रुपयांवर स्थिरावला. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याचा दर रेकॉर्ड स्तरावर गेला असून 2 हजार 78 डॉलर झाला आहे. या वर्षी सोन्याच्या दरात जवळपास 43 टक्के (23 हजार रुपयांची) वाढ नोंदवण्यात आली आहे. कोरोनाचे वाढते संकट यास कारणीभूत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Share: