IMG-LOGO
राष्ट्रीय

प्रख्यात गझलकार राहत इंदौरी यांचे निधन

Tuesday, Aug 11
IMG

आज सकाळीच त्यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली होती. तसंच पुढील उपचारसाठी रूग्णालयात दाखल केल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

इंदौर, दि. ११ ऑगस्ट : सर्वसामान्य नागरिकांपासून अगदी व्हीव्हीआयपी पर्यंत अनेकजण कोरोनाच्या विळख्यात सापडत आहे.  प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांना देखील संसर्ग झाला होता. त्यांनी स्वतः ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली. कोविडची सुरुवातीची लक्षणे आढळून आल्याने मी काल तपासणी करून घेतली, माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. असे त्यांनी ट्विट मध्ये म्हटले होते. आज दोनदा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली”, अशी माहिती अरविंदो रुग्णालयाचे डॉक्टर विनोद भंडारी यांनी दिली.त्यांचा 'बुलाती है मगर जाने का नहीं' हा शेर काही महिन्यांपूर्वी खूप चर्चेत आला होता. या शेरने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळच घातला होता.

Share: