IMG-LOGO
महाराष्ट्र

नारायण राणे यांची शिवसेनेवर टीका

Saturday, Aug 08
IMG

पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे, असा घणाघाती आरोप भाजपचे नेते नारायण राणे यांनी केला.

सिंधुदुर्ग दि ०८ ऑगस्ट : पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे, असा घणाघाती आरोप भाजपचे नेते नारायण राणे यांनी केला. तसेच शिवसेना दुटप्पी असल्याचा टोलाही राणेंनी लगावलाय.राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी विजयदुर्ग किल्ल्याची पाहणी केली. यानंतर राणेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.विजयदुर्ग किल्ल्याची पडझड झाली असून आपण आता पाहणी केली आहे. संबंधित मंत्र्यांशी बोलून या किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करणार आहे. अधिवेशनात ही मागणी करणार असल्याचं राणे म्हणालेत.दोन दिवसांपूर्वी नाणारमधील काही लोकांनी नाणार प्रकल्पाला समर्थन दिलं. त्यात 80 टक्के शिवसैनिक होते. पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे. बोलण्यात काय बदल करतील हे सांगू शकत नाही. पूर्वी विरोध केला आणि आता समर्थन करत आहेत. हे शिवसेनेचे घुमजाव आहेत, असं नारायण राणेंनी म्हटलं आहे.

Share: