महिंद्रा कंपनी व इगतपुरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.
इगतपुरी । दि. १८ मुंबई नाशिक महामार्गावर मुंबईहून नाशिकच्या दिशेने येणारा टेम्पो ट्रॅव्हलर बस क्रमांक एम.एच.०४ जी.पी. ३१३२ ) ही दि.१८ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास इगतपुरी येथील हॉटेल ग्रीनलँड समोर जात असताना अचानक बंद पडल्याने वाहन चालकाने खाली उतरुन बघीलतले असता गाडीमधून धूर निघू लागला व गाडीने पेट घेतला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज असुन सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. गाडीत १२ ते १५ प्रवासी होते. चालकाच्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला. प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी महामार्गाच्या वाहतुक पोलीसांनी विशेष परिश्रम घेतले.तर महिंद्रा कंपनी व इगतपुरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.