IMG-LOGO
नाशिक शहर

नाशिक जिल्ह्यात ५२ हजार १३२ शेतकऱ्यांना इतक्या कोटी पीक कर्जाचे वाटप

Wednesday, Aug 12
IMG

Distribution of crop loan of 1 thousand 362 crore to 52 thousand 132 farmers in Nashik district

नाशिक, दि. १२ ऑगस्ट : जिल्ह्यात आजपर्यंत नाशिक जिल्ह्यात 52 हजार 132 शेतकऱ्यांना 1 हजार 362 कोटी खरीप पीक कर्जाचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आढावा बैठकीत दिली. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या आढावा बैठकित जिल्हाधिकारी सूरज मांढरे बोलत होते. यावेळी जिल्हा उपनिबंधक सतीश खरे, अग्रणी बँकेचे अधिकारी दिलीप सोनार, राष्ट्रीयकृत बॅक, खासगी बँक, व्यापारी बँक व ग्रामीण बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. मांढरे म्हणाले, खरीप पीक कर्ज वाटपात सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांनी चालू आठवड्यात कर्जवाटपाचे चांगले काम केले असून त्यांना 105.94 कोटी ऐवढे उद्देश देण्यात आले होते. त्यापैकी या बँकेने 62.07 कोटी रुपये इतक्या पीक कर्जाचे वाटप केले आहे. तसेच चालू आठवड्यात एच.डी. एफ.सी. बँक, कोटक बँक, यु.बी.आय बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र इत्यादी बँकानी कर्ज वाटपाबाबतचे कामकाज असमाधानकारक असल्याने त्यांना अग्रणी बँक व्यवस्थापकांनी नोटीस देण्याची सूचना यावेळी जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी केली. महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 मधील लाभार्थ्यांना नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र व स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकानी कमी प्रमाणात कर्ज वाटप केले असून या सर्व बँकानी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर कर्ज करण्याबाबतची सूचन यावेळी जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी दिली आहे.

Share: