हरियाणा विधानसभेच्या मतमोजणीच्या पहिल्या दोन तासांत बहुमताकडे वाटचाल करणाऱ्या भाजपाच्या मतांची आघाडी नंतर घटली. याठिकाणी कॉँग्रेसने मुसंडी मारली असून जेजेपीलाही चांगल्या जागा मिळाल्या आहे. एकंदर हरियाणात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असली, तरी विधानसभा त्रिशंकू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जेजेपी किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे.
हरियाणा विधानसभेच्या मतमोजणीच्या पहिल्या दोन तासांत बहुमताकडे वाटचाल करणाऱ्या भाजपाच्या मतांची आघाडी नंतर घटली. याठिकाणी कॉँग्रेसने मुसंडी मारली असून जेजेपीलाही चांगल्या जागा मिळाल्या आहे. एकंदर हरियाणात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असली, तरी विधानसभा त्रिशंकू होण्याची शक्यता आहे.दरम्यान कॉँग्रेस प्रवक्तयांनी सांगितले की कॉँग्रेसचे सरकार हरियाणात स्थापण्याबाबत आम्हाला आत्मविश्वास वाटतोय.शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भाजपाला 36, कॉँग्रेसला 32 आणि जेजेपी आणि इतर 22 जागांवर आघाडीवर होते. भाजपाच्या जागा घटताना दिसत असून ही सर्व स्थिती पाहता सरकार कोण स्थापन करणार त्याची सर्वांना उत्सुकता आहे.दरम्यान या निकालानंतर मनोहरलाल खट्टर यांना दिल्लीत बोलावण्यात आले असून पक्षाध्यक्ष व केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी त्यांची कानउघाडणी केल्याचे समजते. हरियाणाच्या स्थितीवर भाजपाच्या कार्यालयात अमित शाह आणि जे.पी. नड्डा यांची बैठक सुरू असल्याचे समजते. गृहमंत्री अमित शहा यांचा हरियाणातील ग्रेटर नोयडा येथील पूर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे समजते.