IMG-LOGO
महाराष्ट्र

भाजपा नेते एकनाथ खडसेंनी केला मोठा गौप्यस्फोट

Thursday, Oct 17
IMG

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवस शिल्लक असताना भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

भाजपा नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी निवडणूक प्रचार शिगेला पोचलेला असताना एक खळबळजनक खुलासा केल्याने राजकारणात त्याची चर्चा रंगली आहे.एकेकाळी भाजपची बुलंद तोफ म्हणून ओळख असलेल्या खडसे यांना यंदा विधानसभेसाठी पक्षाने उमेदवारी नाकारली. मात्र त्याऐवजी त्यांच्या मुलीला उमेदवारी देण्यात आली.सध्या प्रचारात असलेल्या खडसे यांनी भुसावळच्या सभेत खळबळजनक खुलासा केला आहे. ते म्हणाले की भाजपने उमेदवारी नाकारल्यावर मला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी उमेदवारी देऊ केली होती. त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते पक्षाचा ए बी फॉर्म घेऊन माझ्या घरी आले होते, असेही त्यांनी जाहीर सभेत सांगितले."नाथाभाऊ तुम्ही आमच्याकडे या, तुम्हाला विरोधी पक्षनेते पद देऊ", असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आपल्याला म्हटल्याचे एकनाथ खडसेंनी म्हटल्यावर सभेत खळबळ उडाली.

Share: