IMG-LOGO
प्रशासकीय

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येक ‘मत’ मोलाचे - दिलीप स्वामी

Friday, Oct 18
IMG

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येक मत मोलाचे असुन त्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे आवश्यक असून मतदानाची टक्केवारी वाढणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन उपायुक्त दिलीप स्वामी यांनी केले.

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येक ‘मत’ मोलाचे - दिलीप स्वामी नाशिक दि. १८ l लोकशाहीच्या बळकटीकरणा साठी प्रत्येक मत मोलाचे असुन त्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे आवश्यक असून मतदानाची टक्केवारी वाढणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन उपायुक्त दिलीप स्वामी यांनी केले. निफाड येथील वैनतेय ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स येथे मतदान जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी दीपक पाटील, गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार , शिक्षण विस्तार अधिकारी एस. डी. थोरात, के. एम. बोरसे, वैनतेय विद्यालयाच्या प्राचार्या मालती वाघावकर, उपप्राचार्य डी. बी. वाघ, पर्यवेक्षक रविकांत कर्वे, पर्यवेक्षक एस .एम. सोनवणे, प्रा. राजेंद्र सूर्यवंशी , आदी मान्यवर होते. दरम्यान स्वामी म्हणाले, तरुण वर्गाने आपल्या घरी व परिसरात नागरिकांनी मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करावे, ज्यामुळे मतदानाचा आलेख उंचावण्यासाठी मदत होऊन सुदृढ आणि बलशाली लोकशाही निर्माण करण्यास आपल्या सर्वांचा हातभार लागेल. लोकशाहीच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी निवडणूकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी श्री. पाटील यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निफाड मतदारसंघांमध्ये मतदान जनजागृतीसाठी स्वीप अंतर्गत राबवण्यात आलेले विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच ईव्हीएम व व्हीव्हीपॅट या मतदान यंत्रांची देखील यावेळी माहिती दिली. कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थीनींनी मतदान जागृती व मतदान करण्या विषयीचा संदेश पथनाट्यातून सादर केला यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिंनींना मतदानाविषयी शपथ देण्यात आली . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार व सूत्रासंचालन एस.एन.चकोर यांनी केले.

Share: