IMG-LOGO
नाशिक शहर

प्लॅस्टीक राष्ट्रध्वजाची निर्मिती, विक्री व वापरावर बंदी

Wednesday, Aug 12
IMG

Ban on the manufacture, sale and use of plastic national flags

नाशिक, दि. १२ ऑगस्ट :  भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमात व या कालावधीत नाशिक शहर पोलीस आयुक्तालय परिसरात शहर पोलीस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(1)(2) अन्वये खबरदारीचा उपाय म्हणून बंदी  घालण्याचे आदेश दिले आहेत. सदर आदेशानुसार 10 ते 24 ऑगस्ट 2020 या कालावधीत प्लॅस्टीकचा वापर करून राष्ट्रीय ध्वजाची निर्मिती विक्री व वापर करणे यावर बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखण्याचे आवाहन पोलीस प्रशसनातर्फे करण्यात आले आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान करणे व त्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंध अधिनियम 69/1971 व 51/2005 तसेच ध्वजसंहितेच्या तरतुदीनुसार दंडनीय अपराध आहे.

Share: