IMG-LOGO
नाशिक शहर

मुंबई विभागीय टीमने इगतपुरी येथे एका प्रवासी महिलेला मध्यरात्री प्रसूती साठी केली मदत

Sunday, Jul 26
IMG

मुंबई विभागीय टीमने इगतपुरी येथे एका प्रवासी महिलेला मध्यरात्री प्रसूती साठी केली मदत नाशिक,दि.26जुलै 2020:कोविड १९ संकटात, गर्भवती महिलांसह अनेक गरजू रूग्णांच्या जीवनात रेल्वे सक्रिय भूमिका बजावत आहे. दि. २६.७.२०२० रोजी रात्री ३.१५ सुमारास ०१०९३ मुंबई-वाराणसी विशेष ट्रेन इगतपुरीला येणार होती तेव्हा प्रवास करणार्‍या व प्रसवपीडा होणा-या प्रियांका नावाच्या गर्भवती महिलेला मदत करण्यासाठी इगतपुरीचे उप स्टेशन मॅनेजर श्री अवधेश कुमार यांनी तातडीने मदतीसाठी इगतपुरी येथील रेल्वे आरोग्य केंद्राला माहिती दिली.

मुंबई विभागीय टीमने इगतपुरी येथे एका प्रवासी महिलेला मध्यरात्री प्रसूती साठी केली मदत   नाशिक,दि.26जुलै 2020:कोविड १९ संकटात, गर्भवती महिलांसह अनेक गरजू रूग्णांच्या  जीवनात रेल्वे सक्रिय भूमिका बजावत आहे. दि. २६.७.२०२० रोजी रात्री ३.१५ सुमारास ०१०९३ मुंबई-वाराणसी विशेष ट्रेन इगतपुरीला येणार होती तेव्हा  प्रवास करणार्‍या व प्रसवपीडा होणा-या प्रियांका नावाच्या गर्भवती महिलेला  मदत करण्यासाठी इगतपुरीचे उप स्टेशन मॅनेजर श्री अवधेश कुमार यांनी तातडीने मदतीसाठी इगतपुरी येथील रेल्वे आरोग्य केंद्राला  माहिती दिली.   डॉ. ज्योत्सना, अतिरिक्त  विभागीय वैद्यकीय अधिकारी आणि त्यांचे पथक रूग्णाच्या वैद्यकीय सहाय्यासाठी  धावून आल्या व त्यांनी महिलेला इगतपुरी येथेच उतरण्याचा सल्ला दिला.   प्रसूति वेदना होत असलेल्या  प्रियांकाने रेल्वे मेडिकल टीमच्या सहाय्याने स्थानकावरच निरोगी बाळाला जन्म दिला.   नवजात बाळ आणि महिलेला प्रसूतीपश्चात उपचारासाठी ग्रामीण रूग्णालय, इगतपुरी येथे ॲम्बुलन्सने पाठविण्यात आले.सदर प्रसिद्धी पत्रक मध्य रेल्वे, जनसंपर्क विभाग यांचे द्वारा  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून जारी करण्यात आले आहे.

Share: