हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा फेसबुकवरुन प्रचार केल्याच्या रागातून युवकावर कोढव्यात खुनी हल्ला झाला.
पुणे दि.३१ हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा फेसबुकवरुन प्रचार केल्याच्या रागातून युवकावर कोढव्यात खुनी हल्ला झाला. त्यांची प्रकृती गंभीर आहे़. सुमीत बाबर (वय 36, रा़ कोंढवा) असे या तरुणाचे नाव आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांचा पराभव करुन राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे विजयी झाले. कोंढवा भागात चेतन तुपे यांना अधिक मताधिक्य मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे काम केल्याचा संशय घेऊन 20 ते 25 जणांनी सुमित बाबर याच्यावर हल्ला केला. त्याच्या डोक्यात, हातावर वार केले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चेतन तुपे यांनी विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांचा पराभव केला. सुमित बाबर हे एका बांधकाम व्यावसायिकाकडे नोकरी करतात. त्यांनी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार केला होता. त्या कारणावरुन बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास 7 ते 8 जणांनी सुमित बाबर याला ओढून रस्त्यावर आणले. त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी आजू बाजूला मोठ्या प्रमाणावर लोक जमले होते. मात्र कोणीही पुढे झाले नाही. सुमित रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. यामुळे कोंढवा भागात काही काळ तणाव निर्माण झाला. सुमित बाबर यांना जखमी अवस्थेत जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यांच्या डोक्यावर 17 टक्के पडले आहे. त्यांचा हातही फॅक्चर झाल्याचे सांगण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. या घटनेची माहिती समजताच कोंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.