IMG-LOGO
प्रशासकीय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विधानसभेत पहिलेच भाषण!

Saturday, Nov 30
IMG

मायबाप जनतेच्या आशीर्वादाने पहिल्यांदा या सभागृहात आलो असून महाराष्ट्रातील साधु-संत आणि समाजसुधारकांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडविण्यासाठी आपण प्रयत्न करुया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केले.

 मंत्रिमंडळावर विश्वासदर्शक ठराव १६९ मतांनी संमत झाल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज कामकाज झाले. मुख्यमंत्री म्हणाले की, मंत्रिमंडळावर सदस्यांनी जो विश्वास व्यक्त केला आहे त्याबद्दल मी आभार मानतो.  तमाम जनतेचे आभार मानून छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीबा फुले या समाजसुधारकांना आणि आई-वडीलांना स्मरण करीत महाराष्ट्र घडविण्यचे शपथ घेतली आहे. त्यांचे नाव शपथ घेताना घेतले हा गुन्हा होत असेल तर प्रत्येक जन्मात हा गुन्हा मी करायला तयार आहे त्यांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडविण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.  ते म्हणाले देशात अनेक राज्ये आहेत त्यात महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा असून हे दैवत या मातीत जन्माला आले आहे.  हे राज्य साधु-संताचे, वीरांचे आणि समाजसुधारकांचे आहे. मी मैदानातला माणूस असून वैधानिक वातावरणात आलो आहे ते महाराष्ट्र घडविण्यासाठी असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.  विश्वासदर्शक ठराव संमत झाल्यानंतर मंत्री जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, सदस्य सर्वश्री पृथ्वीराज चव्हाण, अबू आझमी, हितेंद्र ठाकूर, बच्चू कडू यांनी अभिनंदनपर मनोगत व्यक्त केले.  

Share: