कोरोनाच्या प्रतिकूल पार्श्वभूमीवर बरेचसे चित्रपट आपल्या प्रदर्शनाच्या तारखांमध्ये फेरबदल करत आहेत कारण या काळात आरोग्य आणि लोकांची सुरक्षितता अधिक महत्त्वाची आहे.
मुंबई, दि.१० ऑगस्ट : कोरोनाच्या प्रतिकूल पार्श्वभूमीवर बरेचसे चित्रपट आपल्या प्रदर्शनाच्या तारखांमध्ये फेरबदल करत आहेत, कारण या काळात आरोग्य आणि लोकांची सुरक्षितता अधिक महत्त्वाची आहे. आमिर खानची बहुप्रतीक्षित फिल्म 'लाल सिंह चड्ढा' आधी २०२० च्या नाताळमध्ये प्रदर्शित करण्याचे ठरले होते, आता हा चित्रपट २०२१ च्या नाताळमध्ये प्रदर्शित होणार आहे.आमिर खान प्रोडक्शन्स ची 'लाल सिंह चड्ढा' वायकॉम18 स्टूडियो द्वारे प्रस्तुत असून, ज्यामध्ये आमिर खान आणि करीना कपूर खान मुख्य भूमिकेत आहेत. यासोबतच मोना सिंह एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. अतुल कुलकर्णी द्वारे लिखित आणि अद्वैत चंदन द्वारे दिग्दर्शित करण्यात आला असून प्रीतम यांचे संगीत आणि अमिताभ भट्टाचार्य यांनी गीत लेखन केले आहे. चित्रपट यावर्षी ख्रिसमसला प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनामुळे चित्रीकरणच ठप्प झाल्यामुळे त्याचे प्रदर्शन पुढील वर्षी डिसेंबर महिन्यात केले जाणार आहे.