गेल्या आठवड्यापासून परतीच्या पावसाने शेकऱ्यांचे चांगलेच नुकसान केले असून बुधवारी संपूर्ण जिल्ह्यात पावसाने चांगलेच थैमान घातले असून ठिक-ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
अनेकांना जोरदार पावसाचा फटका नाशिक प्रतिनिधी गेल्या आठवड्यापासून परतीच्या पावसाने शेकऱ्यांचे चांगलेच नुकसान केले असून बुधवारी संपूर्ण जिल्ह्यात पावसाने चांगलेच थैमान घातले असून ठिक-ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.नाशिक : शहरात अचानक आलेल्या पावसाने सर्वांची एकच तारांबळ उडाली शहरातील सराफ बाजार , मेन रोड , रविवार कारंजा ,पंचवटी सह अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली.नाशिक जिल्ह्यातील मखमलाबाद मधील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला. दरम्यान नाशिक पूर्व मतदार संघाचे आमदार राहुल ढिकले यांनी नुकसान ग्रस्त मतदार संघातील मखमलाबाद गावांत जाऊन पाहणी केली. येवला : तालुक्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने नगरसुल येथे वीज पडून बैलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.सटाणा : तालुक्यात अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहे.निफाड : तालुक्यातील नैताळे, रामपूर, कोळवाडी, सोनेवाडी, शिवडी, खेडे, उगाव, वनसगाव, सारोळे, खडकमाळेगाव, खानगाव, नांदुर्डी आदी भागात गेल्या महिनाभरापासून दररोज पाऊस अन् ढगाळ हवामान होते. सोमवारी सायंकाळी परिसरात ढगफुटीसारखा पाऊस झाला. त्यामुळे नद्या, नाले, ओहोळ दुथडी भरुन वाहिले. श्रीरामनगर परिसरात काही काळ या पावसावरोबरच गारांचा मारा झाला. त्यामुळे द्राक्ष पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. द्राक्षबागांच्या गोड्याबार छाटण्या जवळपास अंतिम टप्यात आहेत. मात्र, छाटणी झालेल्या द्राक्षबागांत जास्त काळ पावसाचे पाणी साचून राहत असल्याने द्राक्षबागेचे मूळ बंद पडत आहे. याचा परिणाम द्राक्षबागेच्या ओलांड्यावर होत आहे. शिवाय द्राक्षबागा छाटणीनंतर निघणार्या फुटव्यातील द्राक्षमाल अत्यल्प प्रमाणात निघत आहे. तसेच निघालेला द्राक्षमाल जिरत आहे. तर काही घडांचा आकार गोल गोळीसारखा होऊन गळून जात आहे.