IMG-LOGO
महाराष्ट्र

'पुण्य नगरी' वृत्तपत्र समूहाचे संस्थापक मुरलीधर (बाबा) शिंगोटे यांचे निधन

Thursday, Aug 06
IMG

दैनिक 'पुण्यनगरी'चे संस्थापक-संपादक मुरलीधर अनंता उर्फ बाबा शिंगोटे यांचे आज सहा ऑगस्ट २०२० रोजी दुपारी एक वाजता त्यांच्या गायमुख वाडी, तालुका जुन्नर येथील राहत्या घरी निधन झाले.

मुंबई, दि ५ ऑगस्ट : 'पुण्य नगरी' वृत्तपत्र समूहाचे संस्थापक मुरलीधर (बाबा) शिंगोटे यांचे दुःखद निधनदैनिक 'पुण्यनगरी'चे संस्थापक-संपादक मुरलीधर अनंता उर्फ बाबा शिंगोटे यांचे आज सहा ऑगस्ट २०२० रोजी दुपारी एक वाजता त्यांच्या गायमुख वाडी, तालुका जुन्नर येथील राहत्या घरी निधन झाले. बाबांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालूक्यातील उंब्रज या गावी सात मार्च १९३८ ला झाला होता. इयत्ता चौथी शिक्षण झालेल्या बाबांनी शिक्षण अर्धवट सोडल्यानंतर नोकरी-व्यवसायासाठी मुंबई गाठली. त्या ठिकाणी सुरुवातीला फळ विक्री त्यानंतर बुवाशेठ दांगट यांच्याकडे वृत्तपत्र टाकण्याचे काम सुरू केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी मुुंबईतल्या फाउंटन परिसरात आंदोलन झाले होते, त्याचे बाबा साक्षीदार होते. वृत्तपत्र विकताना सर्वसामान्यांना समजेल आणि वाचता येईल, अशा भाषेतले वृत्तपत्र काढण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. १९९४ मध्ये मुंबई चौफेर नावाचे सायं दैनिक सुरू केले. यानंतर दैनिक आपला वार्ताहर, दैनिक यशोभुमी, दैनिक कर्नाटक मल्ला, तामिळ टाईम्स, हिंदमाता ही दैनिके सुरु केली. यातल्या दैनिक पुण्यनगरीची मुहूर्तमेढ १९९९ मध्ये रोवली. मराठी भाषिक वृत्तपत्रांसोबत इतर भाषिक दैनिक प्रकाशित करणारे मुरलीधर शिंगोटे हे एकमेव होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Share: