राकेश लक्ष्मीनारायन जेफ भारतीय रेल सेवे मध्ये लोको निरीक्षक पदावर कार्य करत असतांना प्रवाशांना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन करतात गरज पडल्यास पदरमोड करण्यास देखील मागे हटत नाही.या या शिवाय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य ,सामुदायिक विवाह , गरजू लोकांना ,अनाथ आश्रमांना मदत करण्यास कायम तत्पर असतात.रेल्वे युनियनचे सचिव असून कामगारांचे प्रश्न सोडविण्यास हातभार लावतात महात्मा फुलेंच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी सामाजिक कार्याला सुरवात केली.युवकांना त्यांनी नोकरी च्यामागे न लागता व्यवसायाला प्राधान्य देण्याचा सल्ला देतात.गरीब मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलतात त्यांचा सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना माळी समाज सेवा समितीच्या वतीने सामाजिक कार्याचा महात्मा फुले समाज रत्न पुरस्कार देऊन माळी समाज सेवा समितीच्या महात्मा फुले पुण्यतिथीदिनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे प्रदान करण्यात आला.त्यावेळी आमदार देवयानी फरांदे,माजी नगरसेवक बाळासाहेब जानमाळी ,माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत,शहर कॉंग्रेसचे सरचिटणीस राजकुमार जेफ,ऑल इंडिया सैनी समाज महाराष्ट्र प्रदेश महासचिव पुरणमल सैनी,हिंदी भाषिक सेवा समितीचे अध्यक्ष कैलास सैनी,हरिनारायण सैनी,संतोष मौर्या,सारिका जेफ यांच्यासह समाज पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.