येवला तालूक्यातील ममदापुर-राजापूर व परिसरात गेल्या दोन ते दिवसापासून रिमझिम पाऊस सुरू असल्याने काढणीला आलेल्या भुईमूगाचे पिंक हे शेतात सडून व कूझून चालले आहे.
येवल्याच्या परिसरात रिमझिम पावसाने भूईमूग पिंकाचे नूकसान. येवला दि.२५ l तालूक्यातील ममदापुर-राजापूर व परिसरात गेल्या दोन ते दिवसापासून रिमझिम पाऊस सुरू असल्याने काढणीला आलेल्या भुईमूगाचे पिंक हे शेतात सडून व कूझून चालले आहे. पाऊस हा तीन दिवसापासून दररोज थोड्याफार प्रमाणात येत असल्याने जमीनित ओलावा आला असून भूईमूग कसे काढणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. भुईमूगा बरोबर बाजरी कांदे व कांद्याचे रोपे खराब होत आहे. बळीराजाने कांद्याचे रोप टाकलेले होते मात्र पावसाने आता तीन दिवसापासुन दररोज हजेरी लावल्याने शेतात टाकलेले रोपे पुर्णता खराब झाल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडले आहे.राजापूर येथे अजूनही मोठा पाऊस झालेला नाही.आजही येथील छोठे मोठे बंधारे कोरडेच आहे.तर राजापूरचा काही भागातील विहिरीना थोड्याच प्रमाणातच पाणी उतरले आहे.सध्या रिमझिम पाऊस पडत आहे.त्यामुळे काढणीला आलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नूकसान झाले आहे.भूईमूग पिंक चांगले आलेले असताना परतीच्या पाऊसाने हातात आलेले पिंक शेतकऱ्यांच्या पदरात पडणार नाहीत. हे पिंक काढण्यासाठी आलेले आहे.मात्र पाऊस सारखा अधून मधून हजेरी लावत असल्याने भूईमूग काढण्यासाठी वापसा होत नसल्यामुळे भूईमूग पिंक हे शेतात मोड आलेले आहे.तर पावसामुळे पाला सडून गेला आहे. शेतात उभे असलेल्या पिकाचे मोठे नूकसान झाले आहे.शेतकऱ्यांनी कांदा लागवडीसाठी टाकलेले उळे(रोपं) हे संपूर्ण खराब झाले आहे. विकत उळे हे पाच ते सहा हजार रुपये पायलीने विकत आणून कसेबसे टाकले होते.राजापूर येथे काही ठिकाणी बाजरी सोंगणी सूरू असून काही सोंगण्या आटोपल्या आहे.