IMG-LOGO
COVID-19

भाजप नेते किरीट सोमय्यांना कोरोना, पत्नीही बाधित

Monday, Aug 10
IMG

देशात कोरोना व्हायरस चांगलाच फोफावत असून देशातील राजकीय मंडळींनाही कोरोनाची बाधा होत आहे. आज माजी राष्ट्रपतींसह महाराष्ट्रातील भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यासह त्यांच्या पत्नी डॉ. मेधा सोमय्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. किरीट सोमय्या यांनी ट्विट करून माहिती दिली.

मुंबई, दि. १० ऑगस्ट : देशात कोरोना व्हायरस चांगलाच फोफावत असून देशातील राजकीय मंडळींनाही कोरोनाची बाधा होत आहे. आज माजी राष्ट्रपतींसह महाराष्ट्रातील भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यासह त्यांच्या पत्नी डॉ. मेधा सोमय्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. किरीट सोमय्या यांनी ट्विट करून माहिती दिली.मी आणि माझी पत्नी डॉ मेधा सोमय्या यांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या रुग्णालयात आमच्यावर उपचार सुरु आहेत असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे. त्यांनी या ट्विटमध्ये भाजप महाराष्ट्र, बिजेपी इंडिया, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांना टॅग केले आहे. देशातील अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण होत असून त्यात केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय मंत्री यांचा समावेश आहे.

Share: