जे ठरलंय तेवढंच द्या… सुईच्या टोकाएवढंही अधिक नको, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मुंबई | जे ठरलंय तेवढंच द्या… सुईच्या टोकाएवढंही अधिक नको, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते शिवसेना भवनात बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी 'ते' वक्तव्य करायला नको होतं. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर चर्चा फिस्कटली. पण मला खात्री आहे सगळं सुरळीत होईल, असंही ते यावेळी म्हणाले. सत्तापदांचे समान वाटप हा शब्द मुख्यमंत्र्यांनी जाहीर पत्रकार परिषदेत वापरला व तो सहमतीने वापरला. आता एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री पद हे 'सत्तापदा'त येत नाही असे कुणाचे म्हणणे असेल तर राज्यशास्त्राचे धडे नव्याने लिहावे लागतील, अशी खोचक टीका त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे. शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद देण्याचं आश्वासन आम्ही दिलेलं नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य करायला नको होतं, असंही उद्धव म्हणाले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या आजच्या भूमिकेनंतर भाजप काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.