जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १५ हजार २८१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला
नाशिक, दि. ११ ऑगस्ट : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १५ हजार २८१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४ हजार ६५२ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ६२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २९४, चांदवड ३५, सिन्नर २३४, दिंडोरी ५५, निफाड २१०, देवळा ७५, नांदगांव ७०, येवला १०, त्र्यंबकेश्वर ०६, सुरगाणा ११, पेठ ००, कळवण ०४, बागलाण ६०, इगतपुरी ४५, मालेगांव ग्रामीण ८५ असे एकूण ११९४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार १४३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ३०५ तर जिल्ह्याबाहेरील १० असे एकूण ४ हजार ६५२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात २० हजार ५५३ रुग्ण आढळून आले आहेत.रुग्ण बरे होण्याची टक्केवारीजिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ७२.४६, टक्के, नाशिक शहरात ७४.९९ टक्के, मालेगाव मध्ये ७५.५७ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८३.०६ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७४.५० इतके आहे.मृत्यु :नाशिक ग्रामीण १५६, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ३५२, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ९१ व जिल्हा बाहेरील २१ अशा एकूण ६२० रुग्णांचा मृत्यु झाला आहे. ◼️२० हजार ५५३ कोरोनाबाधित रुग्णांपैकी १४ हजार ८६४ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ४ हजार ६५२ पॉझिटिव्ह रुग्ण.◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७४.५० टक्के.