राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात बसणार असे पक्षाचे नेते शरद पवार सांगत असतानाच विधिमंडळपक्षाचे नेते म्हणून निवड होत असताना अजित पवार यांनी ‘सध्या तरी आम्ही विरोधी पक्षात बसणार आहोत.
राष्ट्रवादीच्या नेतेपदी अजीत पवारांची निवड; सध्यातरी विरोधात बसू पवारांच्या वक्तव्याने खळबळ मुंबई दि. ३०: राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात बसणार असे पक्षाचे नेते शरद पवार सांगत असतानाच विधिमंडळपक्षाचे नेते म्हणून निवड होत असताना अजित पवार यांनी ‘सध्या तरी आम्ही विरोधी पक्षात बसणार आहोत. मात्र राजकारणात कोणीच कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, असे अजित पवारांनी म्हटल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना ऊत आला आहे. अजित पवार यांना नेमके काय म्हणायचे असावे याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. राज्यात जे सरकार येईल ते स्थिर पाच वर्षांसाठी असावे. विरोधी पक्षानेही पाच वर्ष नीट काम करावे, अशी आशा अजित पवारांनी व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री बारातमतीत येऊन म्हणाले होते की गोपीचंद पडळकर आमचा ढाण्या वाघ आहे. मात्र आता त्या ढाण्या वाघाचेमांजर झाले का ते बघा, असा टोला अजित पवारांनी लगावला. अजित पवारांनी भाजपच्या गोपीचंद पडळकरांचा जवळपास १ लाख ६०हजार मतांनी पराभव केला. बारामतीत गोपीचंद पडळकरांसह इतर सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.ते म्हणाले की, राज्यात आणि देशात कितीही लाटा असल्या तरीही बारामतीकरांनी कधीही आमची साथ सोडली नाही. मी दबक्या आवाजात म्हटले होते की निवडणुकीत एक लाखांच्या मताधिक्क्याने निवडून येईन. मात्र बारातमीकरांनी त्यापुढे जात मला त्याहून अधिक मतांनी निवडून दिले. यासाठी अजित पवारांनी बारामतीकरांचे आभार मानले.