IMG-LOGO
महाराष्ट्र

राज्यपालांची बाणगंगा तलावाला भेट; जीर्णोद्धार कार्याची घेतली माहिती

Saturday, Nov 02
IMG

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज वाळकेश्वर येथील ऐतिहासिक बाणगंगा तलाव परिसराला भेट दिली

मुंबई, दि. २ l राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज वाळकेश्वर येथील ऐतिहासिक बाणगंगा तलाव परिसराला भेट दिली तसेच तेथील जीर्णोद्धार व वारसा जतन कार्याची माहिती घेतली. त्यानंतर राज्यपालांनी जवळच असलेल्या कवळे मठाच्या शांतादुर्गा मंदिरालादेखील भेट दिली. जीएसबी मंदिर विश्वस्तांच्या वतीने यावेळी राज्यपालांचा सत्कार करण्यात आला. मलबार हिलचे आमदार मंगलप्रभात लोढा, नगरसेविका ज्योत्स्ना मेहता,महापालिकेचे उपायुक्त प्रवीण गायकवाड, बाणगंगा जतन कार्यात सहकार्य करणाऱ्या आरपीजी फाउंडेशनचे अधिकारी, बाणगंगा तलाव जीएसबी टेम्पल ट्रस्टचे विश्वस्त प्रवीण कानविंदे तसेच कवळे मठाचे विश्वस्त भूषण ज्याक आदी उपस्थित होते. 

Share: