IMG-LOGO
क्रीडा

भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल लग्नबंधनात अडकणार

Wednesday, Aug 12
IMG

भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल अखेर लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी तयार झाला.

मुंबई : दि ०८ ऑगस्ट :  भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल अखेर लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी तयार झाला. शनिवारी त्यानं साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यानं कुटुंबीयांच्या सहमतीनं आम्ही एकमेकांना 'हो' म्हणत आहोत, असं ट्विट चहलने केलंय.YouTuber धनश्री वर्मा आणि चहलचा घरच्या घरी छोटेखानी साखरपुडा सोहळा संपन्न झाला आहे. धनश्रीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही आनंदाची बातमी दिली आहे. धनश्रीने ही बातमी सोशल मीडियावर सांगितल्यानंतर दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.अनेकांना चहल आणि धनश्री वर्माच्या या बातमीने आश्चर्याचा धक्का बसला आहे. लॉकडाउन काळात चहल घरात बसून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत होता.

Share: