IMG-LOGO
राष्ट्रीय

गेल्या २४ तासात ६४ हजार ३९९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले

Sunday, Aug 09
IMG

२१ लाखांचा टप्पा देशातील कोरोनाबाधित रग्णांच्या संख्येने ओलाडंला असून कोरोनाबाधित रुग्णांच्या दिवसागणिक वाढत्या संख्येमुळे देशात चिंतेचे वातावरण आहे.

नवी दिल्ली : दि ०९ ऑगस्ट : २१ लाखांचा टप्पा देशातील कोरोनाबाधित रग्णांच्या संख्येने ओलाडंला असून कोरोनाबाधित रुग्णांच्या दिवसागणिक वाढत्या संख्येमुळे देशात चिंतेचे वातावरण आहे. आतापर्यंत देशात २१ लाख ५३ हजार ११ कोरोनाबाधित रुग्ण झाले आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतची सर्वात मोठी रुग्णसंख्या गेल्या २४ तासांत वाढली आहे. देशात मागील २४ तासांत ६४ हजार ३९९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ८६१ जणांचा मृत्यू झाला आहे.दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. सध्या सहा लाख २८ हजार ७४७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर दुपटीपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत.

Share: