IMG-LOGO
महाराष्ट्र

उध्दव ठाकरे यांनी केला मुख्यमंत्रीपदावर दावा?

Thursday, Oct 24
IMG

विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला 99 तर शिवसेनेला 58 जागा मिळत असून सत्तेच्या चाव्या या शिवसेनेकडेच राहणार असल्याचे अिाण इतकेच नव्हे, तर मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना दावेदार असल्याचे संकेतही उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिले आहेत.

विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला 99 तर शिवसेनेला 58 जागा मिळत असून सत्तेच्या चाव्या या शिवसेनेकडेच राहणार असल्याचे  अिाण इतकेच नव्हे, तर मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना दावेदार असल्याचे संकेतही उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ते बोलत होते. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी माझ्यासोबत बसून फॉर्म्युला ठरवावा असेही ते म्हणाले.लोकसभेच्या वेळी आमचा खरे तर 50-50 असा फॉर्म्युला ठरला होता, पण भाजपा नेत्यांच्या अडचणींमुळे आम्ही कमी जागांवर समाधान मानले, मात्र अजूनही त्यांच्या अडचणी वाढणार असतील, तर मी समजू शकत नाही कारण आम्हालाही आमचा पक्ष वाढवायचा असल्याचे सांगून त्यांनी अप्रत्यक्षपणे सत्तेत शिवसेना लहान भाऊ नाही, तर बरोबरीचे वाटेकरी असल्याचे संकेत दिलेे आहे.विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याप्रमाणेच त्यांनीही निकालावर केलेले भाष्य लक्ष वेधून घेणारे आहे. लोक माजायला लागले तेव्हा जनता त्यांचे पाय जमिनीवर आणायचे काम करते. महाराष्ट्राच्या जनतेने डोळ्यांत अंजन घातले आहे असा टोलाही त्यांनी मित्रपक्ष भाजपाला लगावला आहे.आता कुठलीही बोलणी नाही  दरम्यान महायुतीला अभूतपूर्व यश आणि मोठा जनादेश मिळाला असून युतीचेच सरकार राज्यात येईल असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. निवडणुकीपूर्वी जे काही ठरवायचे होते ते ठरविले असून आता कोणतीही बोलणी होणार नाही असा इशाराही फडणवीस यांनी शिवसेनेला दिला.

Share: