IMG-LOGO
महाराष्ट्र

प्रचाराची धामधूम संपुष्टात, आता मतदानाची प्रतीक्षा

Saturday, Oct 19
IMG

नाशिकसह महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा प्रचार आज सायंकाळी संपुष्टात आला. आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ते 21 तारखेला होणाऱ्या मतदानाकडे.

नाशिकसह महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा प्रचार आज सायंकाळी संपुष्टात आला. आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ते 21 तारखेला होणाऱ्या मतदानाकडे.दरम्यान राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून 1 लाख 35 हजार व्हीव्हीपॅट (मतदार पडताळणी छापील लेखा दर्शक-व्होटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल) 288मतदारसंघात पाठविण्यात आले आहेत.या निवडणुकीसाठी 288मतदारसंघातील 96 हजार 661मतदान केंद्रावर 1 लाख 80 हजार मतदान यंत्र (ईव्हीएम- इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन), 1 लाख 27 हजार नियंत्रण यंत्र (कंट्रोल युनिट) आणि1 लाख 35 हजार व्हीव्हीपॅट (मतदार पडताळणी छापील लेखा दर्शक) आणि  राखीव यंत्रेही पाठविण्यात आली आहेत.निवडणुकांमध्ये मतदानासाठी बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट महत्त्वाचे असतात. विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच व्हीव्हीपॅटचा वापर होणार असून सर्वप्रथम 2019च्या लोकसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर  करण्यात आला होता.

Share: