IMG-LOGO
महाराष्ट्र

या महिन्यात कोसळणार महाविकास आघाडीचे सरकार

Monday, Aug 10
IMG

सुशांत सिंग प्रकरणाला कलाटणी देण्यासाठी शिवसैनिक आंदोलन करत आहे लोकांचे लक्ष मुख्य विषयाकडून वळवायचं त्यासाठी हा वाद पेटवला जात आहे.

मुंबई, दि. १० ऑगस्ट : नारायण राणे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीत एकमत नाही, तिन्ही पक्षांच्या भूमिका वेगळ्या आहेत त्यामुळे सरकार चालताना दिसत नाही, जेमतेम सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंतच हे सरकार राहील असं भाकीत देखील त्यांनी यावेळी वर्तवलं आहे. सरकारच्या इतर कारभारावरून राणेंचे दोन्ही सुपुत्र देखील महाविकास आघाडी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करत असल्याचे दिसून आले आहे.देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात खूप काम आहे, आम्ही मोकळे आहोत, कधी कर्नाटकात येताय, मी येतो असं संजय राऊतांना त्यांनी आव्हान दिलं आहे. संजय राऊतांना मी नेता मानत नाही, मी जाईन त्यांनी यावं असा टोला त्यांनी संजय राऊतांना लगावला आहे. सुशांत सिंग प्रकरणाला कलाटणी देण्यासाठी शिवसैनिक आंदोलन करत आहे लोकांचे लक्ष मुख्य विषयाकडून वळवायचं त्यासाठी हा वाद पेटवला जात आहे.

Share: