जानेवारी महिन्यात 42 हजार रुपये प्रतितोळा असणारा सोन्याचा दर वाढत गेला. गेल्या महिन्यात हा दर 50 हजारांवर गेला.
मुंबई, दि. १२ ऑगस्ट : कोरोना विषाणूच्या लसविषयी सतत सकारात्मक बातम्यांमुळे जगभरातील शेअर बाजारामध्ये खरेदीचे प्रमाण परतले आहे. यामुळे सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे.सोन्याच्या भाव प्रतितोळे ५८ हजार वरुन घसरत ५३ हजार ५०० वर गेले आहेत तर चांदीच्या भावात प्रतिकिलो १४ हजार रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचे भाव ७८ हजार रुपये किलो वरुन झाली ६४ हजार रुपये किलोपर्यंत घाली आले आहेत.गेल्या सात महिन्यांपासून सोने व चांदी दरात सतत वाढ होत आली आहे. जानेवारी महिन्यात 42 हजार रुपये प्रतितोळा असणारा सोन्याचा दर वाढत गेला. गेल्या महिन्यात हा दर 50 हजारांवर गेला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सोन्यातील गुंतवणूक वाढल्याने सोने दरात वाढ होत असल्याचे तज्ज्ञाचे मत होते; पण ही गुंतवणूक कमी झाल्याने सोने व चांदी दरात घसरण होत असल्याचे सांगितले जात आहे.