IMG-LOGO
मुंबई

आरबीआयच्या रेपो दरात बदल नाही : दास

Thursday, Aug 06
IMG

कोरोनाच्या संकटामुळं अडचणीत सापडलेल्या अर्थव्यवस्थेला काहीअंशी दिलासा देणारी बातमी आहे.

नवी दिल्ली दि.०६ ऑगस्ट : कोरोनाच्या संकटामुळं अडचणीत सापडलेल्या अर्थव्यवस्थेला काहीअंशी दिलासा देणारी बातमी आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेच एप्रिल महिन्याच्या तुलनेत सुधारणा होत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या द्विमासिक पतधोरण आढाव्याबाबतची बैठक संपल्यानंतर ते बोलत होते. रिझर्व्ह बँकेच्या रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात कोणताही बदल करण्यात आला नसल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्था नाजूक बनली आहे. या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी नियामक आणि विकासात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या संकटात अडकलेली अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत आहे, असे दास यांनी नमूद केले आहे.२०२०-२१ या संपूर्ण वर्षात जीडीपीची वाढ नकारात्मक दिसत असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.एप्रिल महिन्याच्या तुलनेत देशाच्या अर्थव्यवस्थेत थोडी सुधारणा झालेली दिसून येत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २०२० च्या पहिल्या सहामाहीत जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी घरसण झाली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयातीवरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. तसेच जगभरातील उत्पादन आणि सेवा क्षेत्रालाही याचा मोठा फटका बसला आहे. येत्या काळात कोविड-१९ची (Covid-19) लस उपलब्ध झाल्यास चित्र बदलण्याची शक्यता आहे, असं मत शक्तीकांत दास यांनी व्यक्त केले.

Share: