IMG-LOGO
महाराष्ट्र

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना AB form दिला

Monday, Sep 30
IMG

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना विधानसभा उमेदवारीसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून AB form दिला. शर्मा हे नालासोपारा येथून शिवसेनेकडून निवडणूक लढवणार आहेत. विरार नालासोपारा चा कायापालट, गैरकारभारा चा अंत हा माझा शब्द शिवसेनेची अधिकृत उमेदवारी मिळाल्यावर प्रदीप शर्मा यांची भावना

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना विधानसभा उमेदवारीसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून AB form दिला. शर्मा हे नालासोपारा येथून शिवसेनेकडून निवडणूक लढवणार आहेत.विरार नालासोपारा चा कायापालट, गैरकारभारा चा अंत हा माझा शब्दशिवसेनेची अधिकृत उमेदवारी मिळाल्यावर प्रदीप शर्मा यांची भावना  शिवसेना पक्षप्रमुख  उद्धवसाहेब ठाकरे यांनी विरार नालासोपारा या विधानसभा मतदारसंघातून मला शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून आज AB form दिला. याक्षणी आपले दैवत हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय श्री. बाळासाहेब ठाकरे  यांच्या पवित्र स्मृतीस मी सर्वप्रथम  अभिवादन करतो.   आदरणीय उध्दवसाहेबांनी आणि असंख्य शिवसैनिकांच्या फोर्स ने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचा मी नम्रपणे स्वीकार करीत असून त्यांचा मी कायम ऋणी असेन. धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने, शिवसेना नेते श्री. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यावर सोपवलेली ही कामगिरी मी फत्ते करणार हे निःसंशय.विरार नालासोपाराचा कायापालट, येथील गैरकारभारआचा अंत हा माझा येथील रहिवाशांना शब्द आहे.

Share: