देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशाच्या भवितव्यासाठी महत्वाची ठरणारी मोठी घोषणा केली आहे.
नवी दिल्ली : दि ०९ ऑगस्ट : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशाच्या भवितव्यासाठी महत्वाची ठरणारी मोठी घोषणा केली आहे. काही वेळापूर्वी राजनाथ सिंह हे सकाळी १० वाजता मोठी घोषणा करणार आहेत, असे ट्विट संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत हँडलद्वारे करण्यात आलं होत. तर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करत हि महत्वाची घोषणा केली असून, ते पत्रकार परिषद देखील घेतील असे अपेक्षित आहे.संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी, ' संरक्षण मंत्रालय आता आत्मनिर्भर भारताला मोठी चालना देण्यास तयार आहे. संरक्षण विभागाकडून वापरल्या जाणाऱ्या १०१ सामग्रींची आयात आता थांबवण्यात येणार असून लवकरच त्या पूर्णपणे भारत देशात बनवल्या जातील. त्यामुळे भारतीय सैन्याशी निगडित या सर्व वस्तू आता आपल्या स्वतःच्या तंत्रज्ञानावर निर्मित होतील तर डीआरडीओच्या सहयोगाने या वस्तू बनवण्यात येणार आहे. या १०१ वस्तूंची यादी हि सर्व शक्यता, क्षमता बघता ठरवण्यात आले आहेत. 'तर, या १०१ वस्तूंच्या यादीत कोणकोणत्या गोष्टी असणार आहेत याबाबत देखील त्यांनी स्पष्टता केली आहे. ' आर्टिलरी गन्स, असॉल्ट रायफल्स, कार्वेट्स, सोनार सिस्टीम, संरक्षण वाहतुकीचे विमाने, रडार आणि अशा अनेक संरक्षण सामग्रीचे यात समावेश आहे. यासाठी खास आर्थिक तरतूद करण्यात आल्याचे,' देखील त्यांनी सांगितले आहे. आता लवकरच या संपूर्ण सामग्रीची यादी कळवण्यात येणार असून आर्थिक अंदाज, उत्पादन क्षमतानुसार भविष्यात भारताला स्वावलंबी बनण्यास मोठ्या प्रमाणात मदतीचे ठरणार आहेत.