IMG-LOGO
राष्ट्रीय

देश भावूक होतो अन हे फाईल्स गायब करतात : राहुल गांधी

Saturday, Aug 08
IMG

एप्रिल मध्यापासून भारत-चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील(LAC) तणाव वाढला असून चीनने या भागातील हालचाली देखील वाढवल्या आहेत.

दिल्ली दि ०८ ऑगस्ट :  एप्रिल मध्यापासून भारत-चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील(LAC) तणाव वाढला असून चीनने या भागातील हालचाली देखील वाढवल्या आहेत. याचवरून आता काँग्रेसचे प्रमुख नेते व खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून काल थेट मोदींच्या हिम्मतीलाच आव्हान दिले होते. तर, आज पुन्हा याच महत्वाच्या दस्तावेजांच्या अफरा-तफरीवरून राहुल गांधींनी मोदींना लक्ष्य केले आहे.राहुल गांधी म्हणाले कि, आशा कर्मचारी देशभरातील घराघरापर्यंत आरोग्य सुविधा पोहचवतात. ते खऱ्या अर्थाने आरोग्य वॉरि‍यर्स आहेत. परंतु, त्यांनाच आज आपल्या हक्कांसाठी लढावे लागत आहे. सरकार मुके तर होतेच. परंतु, आता आंधळे आणि बहिरेही झाले आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.दरम्यान, दोन दिवसाच्या काळात जेलभरो सत्याग्रह करण्यात येणार असल्याचे या अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी म्हटले आहे. या संपाला इंटक, आयटक यासारख्या राष्ट्रीय स्तरावरील कामगार संघटनांनी पाठिंबा दिला आहे. करोनाच्या काळात या कर्मचाऱ्यांना खडतर परिस्थितीत काम करावे लागत असूनही त्यांना सुरक्षितता आणि भत्ते नाहीत. त्यांच्या पगाराची बरीच थकबाकी आहे. तसेच पगार वाढीची मागणी करण्यात आली आहे.

Share: