IMG-LOGO
नाशिक ग्रामीण

नांदगाव तालुक्यात आढळला सहा फुटी कोब्रा

Tuesday, Oct 22
IMG

सगळीकडे निवडणूकीची धामधूम सुरू असतांनाच नांदगाव तालुक्यातील हिरेनगर येथील शेतात सहा फूट लांबीचा कोब्रा आढळून आला.

नांदगाव।दि.२२  सगळीकडे निवडणूकीची धामधूम सुरू असतांनाच नांदगाव तालुक्यातील हिरेनगर येथील शेतात सहा फूट लांबीचा कोब्रा आढळून आला. दुपारी दोन वाजेच्या सुमारास येथील रहिवासी मतदान केंद्रावर जात असतांना अचानक शिवाजी वडगर यांच्या शेतात सहा फूट कोब्रा जातीचा सर्प दिसल्याने एकच धावपळ सुरू झाली.तात्काळ सर्पमित्र विजय बडोदे यांंना पाचारण करण्यात आले. सर्पमित्राने मोठ्या शिताफीने सर्पाला पकडले व वनविभागात याची नोंद करून दूर जंगलात सोडण्यात आले.

Share: