हॅटल ट्राईडेंट मध्ये झालेल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या बैठकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून सर्वांनी सहमती दिली आहे.
महाविकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून नेतानिवड!मुंबई :२६ l महाराष्ट्र विकास आघाडीच्या बैठकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून सर्वांनी सहमती दिली आहे. सभेचे संचालन खा. अनिल देसाई यांनी केले. उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते जयंत पाटील यांनी ठेवला त्या प्रस्तावाला कांग्रेस विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी आपले अनुमोदन दिले.जयंत पाटील यांनी दीड दिवसाच्या गणपतीचे आज विसर्जन झाले अशी खोचक टीका फडणवीस यांच्यावर केली. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विकास आघाडी च्या सर्व आमदारांपुढे अभिवादन करुन प्रस्ताव स्विकारला सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना राष्ट्रवादी कांग्रेस चे नेते शरद पवार यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी जुळलेल्या आठवणी काढल्या त्यांचे पारिवारिक संबंधाच्या आठवणींना उजाळा दिला. आज ते जीवंत असते तर त्यांना सर्वाधिक आनंद झाला असता. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बनवणाऱ्या सरकार कडुन शेवटच्या वंचित दुबळ्या माणसाला न्याय मिळेल अशी आशा आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मला कधी मुख्यमंत्री बनेल असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. आज ते पुर्ण होत आहे. २६/११ हल्ला झाला होता आजच्या दिवशी मला मुंबई साठी आपले प्राण देणारे शहीदांची आठवण झाली आहे. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीला काटे असतात. पण मी हातोडा घेऊन उभा आहे. आपण सर्व एक परिवार म्हणून काम करु या सरकारमध्ये सर्व अनुभवी लोक असतील. भाजप विश्वासघाती आहे. फडणवीस ची पत्रकार परिषद बघुन दुःख वाटले पण माझे हिंदुत्व खोटे नाही. मी कमी प्रमाणात विधानभवनात गेलो आहे ते फक्त अभिनंदन करण्यासाठी. पण मला तुमच्या सहकार्याची गरज आहे. तुमच्या सहकार्यामुळे मी मुख्यमंत्री पदाचा स्वीकार करीत आहे. सुप्रिया सुळे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी मदत केली तशीच आज शरद पवारांनी आम्हाला सहकार्य केले आहे. तुम्हाला ही वाटेल की हे सरकार जे आले ते आपले सरकार आहे असा सर्वांना गर्व वाटेल. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी फडणविसांना दोनदा राजीनामा देणारे मुख्यमंत्री म्हणून खोचक टीका केली. तसेच त्यांना शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी अशा तिन्ही पक्षात काम करतांना मिळालेले जुने मित्र मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की आजच्या आनंदात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोलाचे योगदान दिले आहे. महाराष्ट्र विकास आघाडी निर्माण करण्यामध्ये त्यांचे योगदान आहे तेव्हा त्यांना सर्वांनी मोठे मन करून त्यांना आपल्या आघाडीत परत आणावे असा आग्रह धरला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, कांग्रेस चे अशोकराव चव्हाण माजी मुख्यमंत्री, मनोहर जोशी (माजी मुख्यमंत्री), माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ राजु शेट्टी (स्वाभिमानी पक्ष), आ. अबु आझमी (समाजवादी पक्ष), आ. बच्चुभाऊ कडुं, आदी प्रामुख्याने उपस्थित राहुन उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब केले. आज या बैटकीनंतर तिन्ही दलाचे प्रमुख राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना भेटुन सत्तास्थापनेचा आपला दावा सादर करतील व मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव ही देतील तसेच आघाडीच्या समर्थनात सर्व आमदारांचे सह्यांचे सहमती पत्र देईल असे बैठकीत सांगितले.