लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित रांगोळी स्पर्धेतून स्पर्धकांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्रदूषणविरहीत दिवाळी साजरी करण्याचा मानस रांगोळीतून व्यक्त केला.
लोकमान्यच्या रांगोळी स्पर्धेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेशनाशिक दि.२५ l लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित रांगोळी स्पर्धेतून स्पर्धकांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्रदूषणविरहीत दिवाळी साजरी करण्याचा मानस रांगोळीतून व्यक्त केला. सोबतच काही स्पर्धकांनी लोकमान्य रौप्य महोत्सव लोगो आणि रौप्य लोकमान्य लोगो रेखाटून लोकमान्यवरचे प्रेम व्यक्त केले. शहरातील अथर्व मंगल कार्यालयात झालेल्या या स्पर्धेत १४ वर्षांखालील लहान गट आणि १४ वर्षांवरील मोठा गट अशा दोन गटात स्पर्धा पार पडली. यावेळी शंभराहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. लोकमान्य रौप्य महोत्सव लोगो किंवा रौप्य लोकमान्य लोगो, पर्यावरण,स्वप्नातील दिवाळी किंवा माझी दिवाळी असे विषय दोन्ही गटांतील स्पर्धकांनी अतिशय सुबक रांगोळ्या काढत लक्ष वेधले. पर्यावरण आणि दिवाळी या दोन्ही विषयांमधून प्रदूषण टाळण्याचा संदेश रांगोळीद्वारे देण्यात आला.असा आहे स्पर्धेचा निकालया स्पर्धेत मोठ्या गटात स्नेहा नेरकरला पाच हजार रुपयांचे प्रथम , सुरेश म्हैसधुणे व पूजा बेलोकर यांना तीन हजार रुपयांचे द्वितीय (विभागून), सुरेश पवारला दोन हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक देण्यात आले. सुजाता कापुरे,प्रणोती चौधरी, ऐश्वर्या वडनेरे व मीनाक्षी दुसाने (विभागून) यांना एक हजार रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.लहान गटात अर्णिका गाडे हिला चार हजार रुपयांचे प्रथम, दृष्टी साळेकरला दोन हजार रुपयांचेद्वितीय, तर संजना शार्दुलला एक हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक देण्यात आले. प्रिया वांगेकर, दीक्षानागरे, नेत्रा विसपुते यांना पाचशे रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.यावेळी लोकमान्य नाशिकचे व्यवस्थापक प्रकाश चितोडकर, मार्केटिंग व्यवस्थापक सुशांत पाटील यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. परीक्षक म्हणून भारती सोनवणे, मंगला जोगळेकर यांनी काम पाहिले.