IMG-LOGO
महाराष्ट्र

राज्याचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी घेतली शपथ

Thursday, Nov 28
IMG

मुंबई : आज सायंकाळी शिवाजी पार्क येथे झालेल्या भव्य समारंभात राज्याचे २९वे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांचे बंधू राज ठाकरे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षातील दिग्गज नेते उपस्थित होते.

जनता जनार्दनाला दंडवत  मुख्यमंत्री पदाची शपथ दिल्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्र विकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी दोन तर शिवसेनेच्या दोन मंत्र्यांना शपथ दिली. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ, तर काँग्रेस कडून  बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी शपथ घेतली. 

Share: