IMG-LOGO
नाशिक ग्रामीण

निफाड तालुक्यात भिंत कोसळल्याने वृद्धेचा मृत्यू

Friday, Oct 25
IMG

निफाड तालुक्यात संततधार असल्याने घराची भिंत कोसळून एका वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना देवगाव येथे घडली.

निफाड तालुक्यात भिंत कोसळल्याने वृद्धेचा मृत्यू निफाड दि.२५l तालुक्यात संततधार असल्याने घराची भिंत कोसळून एका वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना देवगाव येथे घडली. देवगाव येथील मानोरी रस्त्यालगत राहणारे रांजेद्र माधव लोहारकर यांच्या राहत्या घराची दि. २४ रोजी रात्री ११ च्या दरम्यान चौघाच्या अंगावर घराची मातीची भिंत कोसळली. यात मजुरी करणाऱ्या कलावती माधव लोहारकर (वय ७५) यांचे उपचारा दरम्यान निधन झाले. तर अलका रांजेद्र लोहारकर वय- ४९ , शुभांगा अनिल लोहारकर वय- २२ काव्या अनिल लोहारकर वय- १६ महिन्याची चिमुकली गंभीर जखमी झाल्या आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या चौघांना शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी या चौघांची तत्काळ सुटका करून येथील प्राथमिक आरोग्य केद्रांत दाखल केले. मात्र कलावती लोहारकर यांच्या ड़ोक्याला जबर मार लागल्याने त्यांना निफाड येथे हलविण्यात आले.मात्र ऊपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. या दुर्दैवी घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा सुन,नांतवड असा परिवार आहे.सदर घटनेचा पचंनामा मंडल अधिकारी के.पी.केवारे, तलाठी दिपक किर्डे ,पोलिस पाटील सुनिल बोचरे,कोतवाल निवृत्ती तासकर यांनी केला.

Share: