IMG-LOGO
महाराष्ट्र

भाजपमध्ये निवडणुकीआधी गेलेले आमदार राष्ट्रवादीत परतण्यासाठी उत्सुक ?

Monday, Aug 10
IMG

भाजपमध्ये निवडणुकीआधी गेलेले आमदार राष्ट्रवादीत परतण्यासाठी उत्सुक असून यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. लवकरच यावर निर्णय घेऊन जाहीर केला जाईल.

मुंबई, दि. १० ऑगस्ट : भाजपमध्ये निवडणुकीआधी गेलेले आमदार राष्ट्रवादीत परतण्यासाठी उत्सुक असून यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. लवकरच यावर निर्णय घेऊन जाहीर केला जाईल. असे नवाब मलिक यांनी सांगितले आहे. https://twitter.com/nawabmalikncp/status/1292676215258587136?s=19राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये ते नाराज असल्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. विरोधक राष्ट्रवादीचे आमदार भाजपमध्ये जाणार अशी अफवा पसरवत असून, ही खोटी व निव्वळ अफवा आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीत यायला भाजपचे आमदारच इच्छुक असल्याचेही नवाब मलिक म्हणाले आहेत. याबाबत नवाब मलिक यांनी ट्विट करत राष्ट्रवादीचे आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.

Share: