Former President Pranab Mukherjee is in critical condition
मुंबई दि. १२ ऑगस्ट : प्रणव मुखर्जी यांच्या कन्या आणि काँग्रेस नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ट्वीट करून त्यांच्या वडिलांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. तसंच त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे आभार मानले आहेत. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले आहे. मुखर्जी यांच्यावर आर्मी रुग्णलयात उपचार सुरु आहेत, त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे की, गेल्या वर्षी 8 ऑगस्टला माझ्या वडिलांना भारतरत्न पुरस्कार मिळाला होता, तो माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण होता. बरोबर एक वर्षाने 10 ऑगस्टला त्यांची तब्येत खूपच बिघडली. त्यांच्यासाठी जे योग्य आहे तेच देवाने करावे, त्याचबरोबर मला दुःख आणि आनंद समान पद्धतीने स्वीकारण्याची ताकद द्यावी. मी सर्वांचे आभार मानते."