IMG-LOGO
महाराष्ट्र

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश

Tuesday, Aug 11
IMG

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी, उद्योग व्यवसाय, बेरोजगार तरुण तसेच समाजातील विविध घटकासाठी चांगले निर्णय घेतले असून राज्यावरील कोरोनाच्या संकट काळात मोठ्या हिमतीने त्यांनी आपले कार्य चालू ठेवले आहे.

मुंबई, दि. ११ ऑगस्ट : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा मतदारसंघातून निवडून आलेले राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना हा कष्टकरी शेतकरी, गोरगरीब जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा पक्ष आहे. त्यामुळे शिवसेना विचारांशी आमचे विचार जुळत असल्यामुळे आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रति असलेल्या निष्ठा आणि विश्वासामुळे शिवसेना पक्षात प्रवेश करत आहे,यापुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली माझ्या शेतकरी बांधव आणि गोरगरीब जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत राहील, असंही ट्विट करत शंकरराव गडाख यांनी सांगितलं आहे.

Share: