IMG-LOGO
क्रीडा

नाशिककर अनुभवणार मोटोक्रॉस स्पर्धेचा थरार

Friday, Oct 18
IMG

नाशिक : एम आर एफ मोग्रीप एफ एम एस सी आय राष्ट्रीय सुपरक्रॉस विजेतेपद स्पर्धेचे हे विसावे वर्ष असून २०१९ सालच्या स्पर्धेतील सहा फेऱ्यामधील चौथी फेरी रविवार दि . २० ऑक्टोबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे .

      कोईमतूर , बेंगलोर , बडोदा या ठिकाणी पहिल्या तीन स्पर्धा पार पडल्या असून चौथी स्पर्धा नाशिक येथे होणार आहे . तर पाचव्या फेरीचे ठिकाण अद्याप जाहीर झाले नसून सहावी फेरी गोवा येथे होणार आहे .      भारत सरकार व आंतरराष्ट्रीय ऑलीम्पिक संघटनेच्या मान्यताप्राप्त फेडरेशन ऑफ मोटरस्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया  एफ एम एस सी आय या मोटरस्पोर्ट्स महासंघाच्या मार्गदर्शक तत्वांच्या अधीन राहून या स्पर्धेचे आयोजन केले जाते . सात वर्ष राष्ट्रीय विजेतेपदाचा मान मिळवलेल्या शाम कोठारी यांच्या अधिपत्याखालील गॉड्स्पीड रेसिंग या संस्थेकडे या स्पर्धेचे सर्व अधिकार असून मागील सलग आठ वर्षांपासून गॉडस्पीड रेसिंग या स्पर्धेचे यशस्वीरीत्या आयोजन करीत आहे . बडोदा येथे पार पडलेल्या तिसऱ्या फेरीचे आयोजनही  गॉडस्पीड रेसिंग द्वारे करण्यात आले होते . नाशिक मधील स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाची धुरा सुरज कुटे व सहकारी यांनी सांभाळली असून ट्रॅक बनवण्याचे अत्यंत महत्वाचे व जिकरीचे कामही त्यांनी हाताळले आहे . सुपरक्रॉस हा कृत्रिमरित्या बनवलेल्या मार्गावर मोटारसायकल साठी घेण्यात येणारा स्पर्धा प्रकार असून या मार्गावर वाकदार वळणे व छोटे मोठे उंचवटे बनवलेले असतात . उंचवट्यावरून उंचच उंच उड्या मारत जाणारे स्पर्धक हा मोठा आकर्षणाचा भाग असतो . देवसंदिवस या स्पर्धेला प्रेक्षकांच्या उपस्थितीत लक्षणीय वाढ दिसून येत आहे . प्रायोजक व प्रसिद्धी माध्यमांकडून मिळत असलेल्या भरघोस सहकार्यामुळे सर्वच प्रकारच्या मोटरस्पोर्ट्सला चांगला प्रतिसाद मिळत आहे .      आपले कसब अजमावण्यासाठी स्पर्धकही या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होत असतात . नाशिकमध्ये होत असलेल्या या फेरीसाठी आठ गटांमध्ये विभागून तब्बल ११० स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला आहे .     उत्तम संयोजक अनेक राष्ट्रीय विजेते नाशिकमध्ये तयार झालेले असल्याने मोटारस्पोर्ट्स विश्वात नाशिकचे एक वेगळेच स्थान आहे . नाशिकमधील प्रेक्षकांना देखिल स्पर्धाप्रकारातील बारकावे माहित असल्याने मैदानावर एक वेगळेच उत्साहपूर्ण वातावरण असते .  या स्पर्धेचे आयोजन पेठे इस्टेट , पेठे नगर , मुंबई आग्रा रोड येथे होणार असून शनिवार १९ ऑक्टोबर रोजी वाहनांची व कागदपत्रांची तपासणी होणार आहे . तर रविवार दि. २० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता मुख स्पर्धेला प्रारंभ होईल .

Share: